* राजेश देशमुख एक्साईजचे नवे आयुक्त
* विजय सूर्यवंशींकडे कोकणचा पदभार
* 9 आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई / प्रतिनिधी :- राज्यात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच असून आताही नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आयुक्त देशमुख यांची राज्य उत्पादन शुल्क आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यालय सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला आहे. तर राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांची कोकण विभागीय आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
गेल्याच आठवड्यात राज्यातील 13 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आल्यापासून प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
* कोणत्या अधिकाऱ्यांची बदली ?
1. डॉं. विजय सूर्यवंशी (IAS:NON-SCS:2006) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई यांची विभागीय आयुक्त, कोकण विभाग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. डॉं. राजेश देशमुख (IAS:SCS:2008) विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांना आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे.
3. नयना गुंडे (IAS:SCS:2008) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची महिला व बाल आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. विमला आर. (IAS:SCS:2009) राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई यांची निवासी आयुक्त आणि सचिव, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
5. सिद्धराम सलीमठ (IAS:SCS:2011) जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6. मिलिंदकुमार साळवे (IAS:SCS:2013) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
7. डॉं. सचिन ओंबासे (IAS:RR:2015) जिल्हाधिकारी, धाराशिव यांची सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8. लीना बनसोड (IAS:NON-SCS:2015) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक यांची आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
9. राहुल कुमार मीना (IAS:RR:2021) प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली आणि सहायक जिल्हाधिकारी, गडचिरोली उपविभाग, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
* गेल्याच आठवड्यात या अधिकाऱ्यांच्या झाल्या होत्या बदल्या :-
1. डॉं. कुणाल खेमनार, आयुक्त साखर, पुणे यांची बदली एमआयडीसीचे सहव्यवस्थापक म्हणून करण्यात आली आहे.
2. मंतदा राजा दयानिधी, जिल्हाधिकारी सांगली यांची सिडकोच्या सहव्यवस्थापक पदावर येथे बदली करण्यात आली आहे.
3. अशोक काकडे, एमडी सारथी यांची जिल्हाधिकारी सांगली येथे बदली करण्यात आली आहे.
4. अनमोल सागर, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली भिवंडी निजामपूर मनपा आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.
