वसई / प्रतिनिधी :- माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या ‘यंग स्टार्स ट्रस्ट' यांच्या वतीने रविवार दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विरार पूर्व-कारगिल नगर येथील जी. पी. स्कूलमध्ये हे शिबीर होणार आहे.
या शिबिरामध्ये पेपर कसा लिहावा ? अभ्यास नेमका कसा करावा ? सराव कसा करावा ? पेपर कसे तपासले जातात ? पाल्यांची काळजी कशी घ्यावी ? परीक्षेपूर्वी व परीक्षा काळात कोणती काळजी घ्यावी ? इत्यादी माहिती देण्यात येणार आहे. त्याकरीता तज्ज्ञांकडून मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती माजी स्थायी समिती सभापती तसेच शिबिराचे समन्वयक माजी स्थायी सभापती अजीव पाटील यांनी दिली.