नाशिक पालीवाल महिला मंडळातर्फे हळदी कुंकू व वाण वितरण

नाशिक / प्रतिनिधी :- येथील पालीवाल महिला मंडळातर्फे सालाबादाप्रमाणे मकर संक्रांतीनिमित रथसप्तमीच्या दिनी हळदी कुंकू व वाण वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक महिलांनी तसेच सासू आणि सुना व युवतींनी सहभाग घेतला होता.

कार्यक्रमात महिलांनी एकमेकांना वाण देऊन हळदी कुंकू लावून समूह गीत व भजनांचा कार्यक्रम संपन्न झाला. नंतर परिचय करण्यात आला. अल्पोपाहारानंतर आभार व्यक्त करीत कार्यक्रमाची सांगता झाली.      

याप्रसंगी क्षमाताई पालीवाल, विजयाताई पालीवाल, वंदना पालीवाल, किरण अनिल पालीवाल, मीना रमेश पालीवाल, मनीषा शांतीलाल पालीवाल, धुमाबाई पालीवाल, किरण राजेंद्र पालीवाल, ज्योती पालीवाल, स्नेहल पालीवाल, भारती सुधीर पालीवाल, भारती अरुण पालीवाल, गायत्री पालीवाल, कीर्ती पालीवाल, कोमल पालीवाल, शालिनी पालीवाल, जयश्री पालीवाल, सलोनी पालीवाल, ज्योती गणेश पालीवाल, मयुरी पालीवाल आदी महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post