* हळदी कुंकू समारंभात सौभाग्यवतींचा सन्मान
कर्जत / प्रतिनिधी :- आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व शिवसेना कर्जत शहर महिला आघाडीच्या वतीने उत्साहात हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. या सोहळ्यात सौभाग्यवती महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम केवळ परंपरेचा भाग नसून महिला सशक्तीकरण व एकजुटीचे प्रतीक आहे. महिलांनी आनंदाने आणि उत्साहात सहभाग घेतला, पारंपरिक वेशभूषेत सोहळ्याची शोभा वाढवली.
यावेळी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांच्या योगदानाचा गौरव केला. समाजाच्या विकासात महिलांची भूमिका महत्त्वाची असून, महिलांच्या प्रगतीसाठी नेहमीच आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कटिबद्ध असेल, असे सांगण्यात आले.
