जळगांव / प्रतिनिधी :- महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना रायगड जिल्हा पालकमंत्री पदी नियुक्त करण्यात आले होते. परंतु शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात रायगड जिल्ह्यात मोठा संघर्ष आहे. या संघर्षातून आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे.
महिला सन्मान आणि महिलांचा स्वाभिमान जपणाऱ्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांचे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद पाच वर्ष कुठलीही अडचण न येता अविरत त्यांच्या हातून रायगड जिल्ह्याची सेवा व्हावी यासाठी देशातील मूर्ती स्वरूपातील आणि महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या अमळनेर येथील श्री क्षेत्र मंगळ ग्रह येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे, जळगाव जिल्हा युवती अध्यक्षा मोनिका पवार, विद्यार्थी सरचिटणीस अभिजीत देवरे, सहकारी कुणाल काळे, सोनू हिरे यांनी मंगळ ग्रहावर अभिषेक करून देवाकडे साकडे घातले.
