समस्यांची तक्रार, आमदारांचे विधान आणि लगेच निदान

बुलडाणा / प्रभाकर मांटे :- सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात 'आमदार आपल्या दारी' ही संकल्पना राबविली जात असल्याने प्रशासन आणि जनता यामधील समन्वयातून समस्येची सोडवणूक होत असून  जनतेचे समाधान होत आहे   

१९९९ पासून २०१४ ते २०१९ वगळता २०२४ पर्यंत असलेली एकहाती असलेली घड्याळाची सत्ता पुढे पुढे वेळ, काळनुसार टिकटिक करीत सतत पंचवीस वर्षे   जनतेच्या मनात घर करून बसलेली ही घडी मात्र मतदार संघातील जनतेची सार्वजनिकरित्या विकासात्मक घडी बसवू शकलेली नाही.

अगोदरच मतदार संघावर जातीपातीचा डाग पुसण्याचे काम या वेळेस राष्ट्रमातेच्या विचाराने प्रेरित असलेल्या मतदारांनी केले घडी तीच मात्र घडीचा हात बदलला  आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेला साजेसे काम करण्याचा योग मनोज देवानंद कायंदे यांना मिळाला.

जिल्ह्यात एकमेव घडीचा आमदार आणि आता घडीचाच पालकमंत्री मिळाल्याने विकासाची घडी वेळेवर धावणार  मात्र जनतेच्या अपेक्षा जेव्हा वाढते तेव्हा एखादा कर्तव्यदक्ष व्यक्ती प्राप्त होतो. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे ज्या गावच्या समस्या त्याच गावात सोडवून बाहेर पडतात. अगदी त्याच पद्धतीने मनोज कायंदे हे सुद्धा या गावचे व्यक्ती त्या गावच्या कार्यक्रमात येऊ देत नाहीत.  त्यामुळे जागेवरून फोन, आमदारांचे एक विधान आणि समस्येवर निदान होत असल्याने जनमानसात 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल' अशी प्रतिमा आ. कायंदे यांची तयार झाली आहे. आमदार आपल्या दारी ही संकल्पना राबवत असतांना मतदारसंघ हे घर झाल्याने आमदार होण्याअगोदर मनोज कायंदे यांचे घर हे घरीच राहून गेले आहे, त्यामुळे व्यस्त आमदार कायंदे यांच्यावर फोन घेत नाही, संपर्क होत नाही, असा नामुष्कीचा प्रसंग ओढवू शकतो.

Post a Comment

Previous Post Next Post