सौर ऊर्जा पंप योजनेतील अडथळ्यांबाबत ऊर्जा मंत्री अतुल सावे यांना आरपीआय नेते तुषार कांबळे यांचे निवेदन

खोपोली / मानसी कांबळे :- राज्य शासनाच्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंप योजनेत अनेक अडचणी येत असून लाभार्थ्यांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या समस्यांबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांनी ऊर्जामंत्री अतुल सावे यांना मुंबई येथे भेटून निवेदन दिले.        

शेतकरी आणि सामान्य नागरिकांना योजनेची संपूर्ण माहिती मिळत नाही, याकरिता शासनाने प्रभावी जनजागृती करणे आवश्यक आहे. अर्जांसाठी आवश्यक कागदपत्रांची स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असून संबंधित विभागांकडून योजनेच्या अंमलबजावणीबाबत योग्य सहकार्य मिळत नसल्याच्या देखील नागरिकांच्या तक्रारीमध्ये वाढ होत आहेत. तसेच काही वेळा मंजुरी मिळाल्यानंतरही पंप बसवले जात नाहीत किंवा निधी वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे या योजनेचा योग्य लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी, जनजागृती अभियान राबविणे, अर्ज प्रक्रिया सुलभ करणे, अधिकाऱ्यांना उत्तरदायी धरणे आणि प्रभावी पर्यवेक्षण करणे अशा मागण्यांचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. 

यावेळी ऊर्जामंत्र्यांना निवेदन देताना तुषार कांबळे यांच्यासोबत अपर्णा म्हेत्रे, आरपीआय महिला महाराष्ट्र प्रदेश सचिव पल्लवी होळकर, जॉय सलडाना, तुषार कांबळे यांचे सहकारी राहुल मंगळे आणि आरपीआय कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post