* मानव सेवा फाऊंडेशनचा उपक्रम
अकोला / प्रतिनिधी :- मानव सेवा फाऊंडेशन सामाजिक व सार्वजनिक मंडळ अकोला जवळ-जवळ 7 वर्षापासून अर्थात नोव्हेंबर 2018 पासुन ते आज, 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत कधीही न चुकता प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी ठीक 9 वाजता जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईकांना व गोरगरिब गरजू लोकांना अन्नदान करीत असते.
संत गाडगेबाबा यांनी सांगितल्याप्रमाणे भुकेल्यास अन्न व तहानलेल्यास पाणी द्यावे हे अंगीकारून आज, 15 फेब्रुवारी 2025 ला सकाळी ठीक 9 वाजता शासकीय स्त्री रुग्णालयात अन्नदान करण्यात आले. आजचे अन्नदान श्री सत्यसाई समिती शाखा अकोलातर्फे करण्यात आले.
या प्रसंगी सत्य साई समितीचे शिवनारायण तिवारी, स्मिताताई मिश्रा, अनिताताई टाक, हरशु रत्नपारखी, दिपालीताई रत्नपारखी, राजु दहिकर, निभोत साहेब, राजेश धनगांवकर, विवेक सातपुते, सीताराम मुंदडा, राहुल खंडाळकर, कैलास खरात, कैलास हिवराळे, सिद्धार्थ इंगळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे विवेक सातपुते यांनी सर्वांचे आभार मानले.
