डॉं. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

रायगड / प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉं. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2024-25 साठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून जिल्ह्यातील इच्छूक शाळांनी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्याकडे दि. 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती रायगड-अलिबाग जयसिंग मेहेत्रे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post