* धुळीच्या 'अॕलर्जीने' नागरिकांना होतोय मोठा त्रास
गेवराई / प्रतिनिधी :- 'हम करे सो कायदा' असा नियम सध्या शहरात सुरु आहे. संजयनगर भागातून जात असलेल्या कोल्हेर रोडवरील रस्त्याच्या कामात चालढकल व काम कासवगतीने सुरु असून धुळीच्या 'अॕलर्जीने' नागरिकांना मोठा त्रास होतोय. सदरील काम चालू झाल्यापासून अनेकदा 'खंड' पडला आहे. परिणामी कित्येक झालेल्या अपघातात नागरीक जखमी झाल्याच्या घटना ताज्या आहेत.
याबाबत अधिक माहीती अशी की, गेवराई शहरातील 'रस्त्याच्या' कामातील डुप्लिकेटपणा झाकण्यासाठी 'अतिरिक्त थ्रेड' खडीचा वापर झाला आहे. परिणामी वाहने घसरुन रस्त्यावर कोसळली आहेत, अनेक जण जखमी झाले आहेत, यात महिलांचा देखील अधिकतेने समावेश आहे. गेवराई नगरातील नागरिकांना धुळीमुळे 'श्वसनाचे' आजार वाढले आहे. रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून दुचाकी स्लिप होऊ लागल्या आहेत तसेच इतर वाहनांच्या टायरमध्ये गुंतलेली खडी उडून अनेक जखमी झाल्याच्याही घटना ताज्या आहेत.
या रस्ता कामात बोगसपणा असून डांबराची कमतरता आहे, कंत्राटदाराला फोन केल्यास मुजोरीची भाषा होतेय. मी सर्व पुढार्याचा जवळचा गुत्तेदार असल्याचे सांगून नागरिकांना दबावात टाकले जाते. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने या विषयाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. उपकार्यकारी अभियंता चिरके यांची उडवाउडवीचे उत्तरे अशोभनिय आहे. गुत्तेदाराने कामात बोगसपणा केला तरी चालतो, कामात दिरंगाई केली तरी चालते, कामामुळे अपघात होऊन नागरीक जखमी झाले तरी चालते, आणि गुत्तेदाराचे हे सर्व लाड का पुरवले जाते त्याचे उत्तर मिळते ते फक्त 'अर्थपूर्ण' कारणाने, आणि ही सत्यता नाकारता येत नाही. कासवगतीने चालू असलेले काम तत्परतेने व दर्जेदार व्हावे हीच नागरीकांची माफक अपेक्षा आहे.
