ऋतुराज वसंत - या राज्यस्तरीय आठव्या अद्याक्षर मुक्त कविता लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर!

मुंबई / पंकजकुमार पाटील :- भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई, या संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे वसंत ऋतूत घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आठव्या मराठी भाषा ऋतुराज वसंत मुक्त अद्याक्षर कविता लेखन स्पर्धेचे (फेब्रुवारी 2025) नुकतेच आयोजन करण्यात आले होते. ऑनलाइन स्वरुपात झालेल्या या काव्यलेखन स्पर्धेत अनेकानेक कवींनी सहभाग नोंदविला. कमीत कमी शब्दांत आशयघन व प्रेरणादायी शब्दरचना याशिवाय लेखनातील रचनावृत्त, शब्दलयता आदी व अद्याक्षर रचना आदी निकष यासाठी निश्चित केले होते.

यामध्ये राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक सुचेता सावंत (दादर) यांना द्वितीय क्रमांक विभागून रिया लोटलीकर (बोरिवली ,मुंबई ), अन्वया काणे (विलेपार्ले ) व रंजना शिंदे (मुंबई) यांना तृतीय क्रमांक विभागून वंदना माईन (अंधेरी), पुनम पतंगे (पनवेल ), वसुंधरा मराठे (ठाणे), इक्षिता फडके (विलेपार्ले) यांना तर उत्तेजनार्थ विनय सरदेसाई (रत्नागिरी) आणि सुजाता फडके (विलेपार्ले) यांना मिळाला.

सर्व विजेत्या कविवर्यांना संस्थेच्या परिवारातर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉं. आनंद सर व संस्था संबंधित मराठी भाषा व समिक्षा क्षेत्रातील विविध अभ्यासक यांचे यासोबतच काव्य स्पर्धेच्या संयोजिका सुजाता आंबेरकर, शिवपद्म वडाळकर, स्पर्धा संयोजक संदेश कदम यांचे यामध्ये योगदान लाभले.


Post a Comment

Previous Post Next Post