आंतरराष्ट्रीय मानवधिकार दूत संघटनेच्या दिवा शहर अध्यक्षपदी अरविंद कोठारी

ठाणे / अमित जाधव :- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दूत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व अंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉं. अविनाश संकुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अध्यक्ष डॉं. अफसर चांद कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली आणि  महाराष्ट्राचे सतीश केळशीकर यांच्या आदेशाने दिवा शहर अध्यक्ष म्हणून अरविंद कोठारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर ही संस्था स्त्री भ्रूणहत्या, बालविवाह, महिला अत्याचाराविरुद्ध आवाज उठविते असून अनेकांना न्याय देण्याच काम करीत आहे. 

अरविंद कोठारी हे समाजसेवकांच्या माध्यमातून गेली 10 ते 15 वर्षे जनतेची सेवा करत असून काँग्रेसमध्ये  त्यांना विविध पदे भूषविण्याचा मान देखील मिळालेला आहे. समाजसेवेच्या माध्यमातून ते नेहमीच समाजहिताचे कार्य करीत असतात आणि  समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार या विरोधात आवाज उचलून मोर्चे, आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधत असतात. त्यांनी आजवर केलेल्या समाजकार्याची उचित दखल घेत अंतराष्ट्रीय मानवधिकार दूत संघटनेचे दिवा शहर अध्यक्ष या पदावर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले  आहे. सदर नियुक्ती झाल्याबद्दल समाजातील विविध घटकांकडून तसेच दिवा शहरातील मित्र परिवाराकडून त्यांचे मोठ्या प्रमाणावर अभिनंदन व कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post