परशुराम तासतोडे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

* एआयपीटीएफ रायगडचा शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न 

खालापूर / सुधीर देशमुख :- जागतिक शिक्षक महासंघाची संलग्न अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा :  रायगड मार्फत जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार माणगांव या ठिकाणी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 

या सोहळ्यात पुरस्कार परशुराम कुंडलिक तासतोडे  यांना देखील पुरस्कार मिळाला. त्यांच्या शैक्षणिक कार्याची सुरूवात 2009 पासून रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिलवले ठाकूरवाडी (ता. खालापूर)  येथून झाली होती. यावेळी शाळा इमारत बांधकाम, 100%  विद्यार्थी पटनोंदणी, उपस्थिती व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा ध्यास त्यांनी घेतला. विविध संस्थेच्या माध्यमातून शाळेचा भौतिक विकास केला. 10 वर्षाच्या सेवेनंतर पोलादपूर येथील गोवेले येथे अतिदुर्गम भागात सलग 4 वर्षे सेवेत शाळा स्तरावर विविध उपक्रम, लोकसहभाग त्यांनी वाढविला. सध्या जिप शाळा डोणवत येथे ते कार्यरत आहेत. 

त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सहकार व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल ग्रुप ग्रामपंचायत तांबडीचे सरपंच अविनाश आमले, विश्वास पाटील, सदस्य शितल पाटील, रितेश मोरे, अमोल भापकर, पत्रकार सुधीर देशमुख व शाळा व्यवस्थापन समिती डोणवत अध्यक्ष सुजाता सुधीर देशमुख आदी मंडळीनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.       

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे  जिल्हा अध्यक्ष सोपान चांदे, परशुराम मोरे, सीताराम जाधव, महादेव मदने यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांच्या तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर क्रिकेट स्पर्धा, सहकार क्षेत्रातील कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, संघाच्या सर्व  कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता. अशा विविध स्तरावर कार्याची दखल अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ - रायगड कार्यकारीने घेवून त्यांना हा गुणगौरव व सन्मानपत्र देऊन सत्कार केला.              

या गुणगौरव सोहळा कार्यक्रमात 15 तालुक्यातील 15 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले तसेच 6 विशेष शिक्षक पुरस्कार देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post