दिव्यात कारवाईच्या भीतीने रहिवाशी झाले आक्रमक

* फाशीची प्रतिकृती तयार करीत प्रशासनाचा विरोध

ठाणे / अमित जाधव :- दिवा आगासन रोडवर १८ वर्षे जुनी असलेल्या अंनत पार्क या इमारतींवर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाईची टांगती तलवार असून आज येथील रहिवाश्यांनी ठाणे महापालिकेच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करीत प्रशासन व न्यायव्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे.

दिवा चौक भागात तळ अधिक तीन मजली अंनत पार्क इमारत असून त्या साधारण १२/१३ वर्षे जुन्या आहेत. याठिकाणी १३७ कुटुंबे वास्तव्यास असून या ठिकाणी ३२ गाळे आहेत. येथील इमारत धारकांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर डीम कनव्हेन्ससाठी प्रक्रिया सुरु केली होती. त्याचवेळेस जागा मालक आणि रहिवाशांमध्ये वाद झाल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले होते. मधल्या काळात क्लस्टर मार्फत करण्यात आलेल्या सर्वेत या तीनही इमारती पात्र ठरल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या मुलांच्या परीक्षेच्या तोंडावर पालिका व प्रशासन आम्हाला बेघर करू इच्छित आहेत, याचा निषेध म्हणून फासावर लटकवा अशी प्रतिकृती लावून निषेध व्यक्त करण्यात आला. तर इमारतीतून फासाचे दोर टाकून निषेध व्यक्त केला गेला. रहिवाशांना देखील आपली बाजू मांडण्यासाठी संधी मिळावी, अशी मागणी मुंब्रा पोलिस स्टेशनचे वपोनि अनिल शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post