मुस्लिम कब्रस्तान अंधारापासून मुक्त होणार !

* प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा शहराध्यक्ष बल्ली राजा यांनी सुरू केलेले मुस्लिम कब्रस्तानात रोषणाईचे काम

अकोट / मोहम्मद जुनेद :- कब्रस्थान ठिकाणी नगर परिषद स्तरावरुन हायमास लाईट लावण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष बच्चुभाऊ कडू, जिला अध्यक्ष कुलदीप वासू, सुशील पूंडकर, तालुका अध्यक्ष गणेश गावंडे, शहर अध्यक्ष गोलू भगत, समीर जमादार, डॉं. यूसुफ नाजिम शेख, शफीक जामदार, नाईम मिर्जा, शेख शाहरुख, अदनान शेख यांनी केली आहे.

ऊर्दू हायस्कुल अंजनगाव रोड मागे आंबोडीवेस कब्रस्थान, मुफुशा कब्रस्थान, राहुल नगरच्या बाजुला, मलकतुजारपुरा कब्रस्थान, नंदीपेठ कब्रस्थान या पाच मुस्लीम कब्रस्थानमध्ये हायमास लाईट लावण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण या ठिकाणी रात्री-बेरात्री लोकांची वर्दळ असते. तसेच सदरहू वरील नमुद ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. तसेच रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे व सरपटणाऱ्या जीवांचा मोठ्या प्रमाणात धोका असल्याकारणाने या ठिकाणी मोठ्या प्रकाशाच्या हायमासच्या लाईट लावण्याची आवश्यकता भासत आहे, असे निवेदन देण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post