श्री स्वामी विवेकानंद हायस्कूलचा दहावीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप

* हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न 

खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर शहरातील श्री स्वामी विवेकानंद हायस्कूल ही गोरगरीब, मध्यमवर्गांतील  मुलांना शिक्षण देणारी एकमेव हायस्कूल असून या शाळेने अनेक विद्यार्थी घडविण्याचे प्रामाणिक कार्य केले आहे व करीत आहे. ज्ञान, विज्ञान, सुसंस्कार, शिक्षण प्रसार या उदात्त हेतूने प्रेरीत होऊन परमपूज्य बापूजी साळुंखे यांनी या शाळेची मुहूर्तमेढ रोवली होती. 

बारावी (एचएससी) च्या परिक्षा सुरू झाल्या आहेत. लवकरच दहावी (एसएससी) च्या परिक्षा सुरू होणार आहेत. दरम्यान, श्री स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या वतीने आपल्या महाविद्यालयातील दहावी (एसएससी) च्या विद्यार्थ्यांचा निरोप तसेच बोर्डाच्या परिक्षेसाठी शुभेच्छा देण्यासाठी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ देखील संपन्न झाला. 

या कार्यक्रमाला खालापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा रोशना मोंडवे, सल्लागार समितीचे अध्यक्ष देवकिसन जाखोटीया, बांधकाम सभापती उज्वला निधी, नगरसेविका लता लोते, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा साप्ताहीक खालापूर वार्ताचे संपादक सुधीर गोविंद माने, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र शहा, रमेश शहा, माजी विद्यार्थी प्रसाद लिमये, शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गोडसे, यश क्लासेसचे संचालक संतोष गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार राजू मुळेकर, मंडावळे मैडम, माळी सर व शाळेचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शाळेची प्रार्थना व विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी प्रस्ताविक केले. त्यानंतर इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्षा रोशना मोडवे, पत्रकार सुधीर माने, पत्रकार राजू मुळेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गोडसे, माजी विद्यार्थी प्रसाद लिमये, शिक्षक राणे सर, कोकणे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

शाळेची ओळख आता सातासमुद्रापार निर्माण करणारे आयटी इंजिनिअर प्रसाद लिमये यांनी मुलांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मुलांनी आईवडील, गुरुजन यांनी दिलेले संस्कार आयुष्यात कधीही विसरू नये. त्याच्या कार्याची जाणीव ठेवून ध्येय व उद्दिष्टांपर्यंत पोहोचावे, असे सांगितले. या कार्यक्रमात मागील शैक्षणिक वर्षी एसएससी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या व प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या तसेच गणित, इंग्रजी विषयात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या, तसेच पाचवी ते नववीमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व चांगल्या मार्कांने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि खेळामध्ये व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. आदर्श विद्यार्थी व विद्यार्थींनीचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. 

दरम्यान, निरोप समारंभ प्रसंगी दहावी (एसएससी) च्या मुलांनी शाळेस भेट वस्तू दिली. हर्षल गोडसे व पालकांनी मोठे घड्याळ भेट म्हणून दिली. यावेळी इनरव्हील क्लबच्या क्षमा आठवले यांनी देखील मुलांना मार्गदर्शन करून या शाळेचे रूपांतर ज्युनिअर कॉलेजमध्ये व्हावी अशी इच्छा मान्यवरांच्या समक्ष व्यक्त केली. या कार्यक्रमाला दानशूर व सामाजिक कार्यकर्त्यांनी भरीव मदत केली व भविष्यातही सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. यानंतर राणे सरांनी आभार मानले. मुलांना खाऊ वाटून कार्यक्रमाचा समारोप झाला.

Post a Comment

Previous Post Next Post