शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती उत्सवात साजरी

* मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती

पुणे / अक्षय कांबळे :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती उत्सवात सहभागी होत, शिवजन्मभूमीला वंदन केले. यावेळी दरवर्षीप्रमाणे बाळ शिवरायांचा पाळणा सोहळा, राजमाता जिजाऊ वंदना, पोलिस मानवंदना आणि शिवनेरी भूषण पुरस्कारासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व शिवभक्तांशी संवाद साधतांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे महाराष्ट्राची अस्मिता आणि अभिमान आहेत. त्यामुळे त्याचे संवर्धन आणि जतन करणे हे छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून आपले सर्वांचेच कर्तव्य आहे. महाराजांच्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी महायुती सरकार नेहमीच प्रयत्नशील असून येत्या काळातही सर्व गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी लागणाऱ्या निधीची कधीही कमी पडणार नाही, असे आश्वासन दिले आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post