निर्यातक्षम आंबा बागांची मँगोनेट प्रणालीद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन

अलिबाग / प्रतिनिधी :- युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यात करण्यासाठी अपेडाच्या मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सन २०२४-२५ या हंगामाकरिता रायगड जिल्ह्यात आजअखेर १५३० आंबा बागांची यशस्वी नोंदणी झाली आहे. पूर्वी ३१ डिसेंबर २०२४ ही अंतिम तारीख होती, मात्र अपेडा, नवी दिल्ली यांच्या विनंतीनुसार नोंदणीसाठी मुदत दि. २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील उर्वरित आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या मुदतीचा लाभ घेऊन त्वरित मँगोनेट प्रणालीद्वारे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रायगड यांनी केले आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे : अर्ज (प्रपत्र 1), 7/12 व 8 अ उतारे, आधार कार्ड, बागेचा नकाशा आदी.

नोंदणी प्रक्रिया : संबंधित कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. क्षेत्राची तपासणी करून अहवाल (प्रपत्र 4-अ) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना सादर करावा. यानंतर 2 ब प्रपत्राद्वारे नोंदणी प्रमाणपत्र दिले जाईल.

शेतकऱ्यांनी Good Agricultural Practices (GAP) पद्धतीचे पालन करावे व आंबा बागेतील पिक संरक्षणाच्या नोंदी प्रपत्र क मध्ये वेळेत कराव्यात. मँगोनेट प्रणालीमुळे हापुस आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक चांगला दर मिळण्यास मदत होईल.

रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन भौगोलिक मानांकन (GI) चा लाभ घ्यावा व आपल्या आंबा उत्पादनाची निर्यात साधावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रायगड यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post