जिल्ह्यात स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उभारणीला गती

* जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीने अंमलबजावणीचे आदेश

रायगड / प्रतिनिधी :- स्तनदा मातांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्षाची सुविधा असावी, या शासकीय धोरणाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या शासकीय इमारतीत अद्याप हिरकणी कक्ष सुरू करण्यात आलेला नाही तेथे हिरकणी कक्ष तात्काळ स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील विविध कार्यालयात हिरकणी कक्ष कार्यान्वित करण्यात येत आहेत

शासकीय कार्यालये आणि सर्वच महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उभारावेत हा 2012 सालचा शासन निर्णय. भारतीय स्तनपान प्रसारक मंडळाच्या महाराष्ट्र शाखेने याची शिफारस केली होती. यात 60X60 ची स्वतंत्र खोली स्तनपानासाठी असावी, तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पलंग- गादी, चांगले बेडशीट, तक्क्या- उशा, पंखा असावा, हिरकणी कक्षाच्या भिंतीवर स्तनपानाचे महत्त्व आणि शिशुपोषणाच्या शिफारशी आदींची सचित्र माहिती असावी, अश्या शिफारशी होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post