अकोला जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालय अन्नदान

* छायाताई लोणकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम 

अकोला / प्रतिनिधी :- मानव सेवा फाऊंडेशन, सामाजिक व सार्वजनिक मंडळ अकोलाच्या माध्यमातून शनिवार, 1 फेब्रुवारी 2025 रोजी छायाताई लोणकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शासकीय स्त्री रुग्णालयात अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी आशिष चंद्रकांत लोणकर, सरिता लोणकर, अभिषेक, वैशाली तथा भक्ती अभिषेक लोणकर यांच्याकडून अन्नदान करण्यात आले. त्याचप्रमाणे यावेळी देशमुख मॅडम, गणेश वानखडे, रेडिओ ऑरेंज सिटीचे आरजे दिव्या मॅडम, राजेश धनगांवकर, विवेक सातपुते, सीताराम मुंदडा, प्रा. रवी अण्णा देशमुख, राहुल खंडाळकर, कैलास हिवराळे, कैलास खरात, सिद्धार्थ इंगळे आदी उपस्थित होते. या सर्वांचे मंडळाच्या वतीने विवेक सातपुते यांनी आभार व्यक्त केले. 

मानव सेवा फाऊंडेशन सामाजिक व सार्वजनिक मंडळ अकोला नोव्हेंबर 2018 पासून ते 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत न चुकता महिन्याच्या प्रत्येक शनिवारी नियमितपणे रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना व गोरगरिबांना अन्नदान करीत असते. त्याचबरोबर थंडीच्या दिवसांत नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात उघड्यावर झोपलेल्या गोरगरिबांना व वंचित बंधु-भगिनींना ब्लँकेट व उलन कानटोपीचे वाटप करत असते. वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम या मंडळाच्या राबविण्यात येतात. पावसाळ्यात वृक्षारोपण, स्वछता व साफसफाई अभियान राबविणे, गजानन महाराज प्रगटदिनाचे औचित्य साधून पायी जाणाऱ्या भक्तांना थंड पेय देणे असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.  

Post a Comment

Previous Post Next Post