पहिल्या राज्यस्तरीय ड्रीब्लिंग बॉल क्रीड़ा स्पर्धां

जळगांव / प्रतिनिधी :- जळगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे जळगाव जिल्हा ड्रिब्लिंगबॉल स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे पहिले महाराष्ट्र राज्यस्तरीय ड्रिब्लिंग बॉल क्रीड़ा स्पर्धेचे राज्यस्तरीय कनिष्ठ व वरिष्ठ पुरुष व महिला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते सकाळी साडेदहाला करण्यात आले. 

याप्रसंगी कार्यकारी अध्यक्ष नंदकिशोर खैरनार, उपाध्यक्ष अशफाक शेख, सेक्रेटरी विकास शेळके, अविनाश जोशी, राहुल ढोले, आरती ठाकरे, लीलाधर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विकास शेळके केले. तसेच कांबळे, प्रा. डॉं. अनिल बडे, संजीव पाटील, सूर्यभान पाटील, संतोष सुरवाडे, जळगांव पोलिस स्पोर्ट्स इन्चार्ज दीक्षा इंगळे या पाहुण्यांचा सत्कार ड्रीब्लिंग बॉल स्पोर्ट्स असोसिएशन जिल्हाध्यक्ष डॉं. शरीफ बागवान, सचिव डॉं. आसिफ खान यांनी नियमाची संपूर्ण माहिती दिली. अध्यक्षीय भाषणामध्ये आ. चंद्रकांत सोनवणे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, खेळामुळे खेळाडूचा जीवनामध्ये डिसिजन घेण्याची क्षमता वाढते व शरीर सुदृढ व आरोग्य निरामय होतो म्हणून प्रत्येकाने खेळाडू व्हावे असे म्हटले.

Post a Comment

Previous Post Next Post