* सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे आरपीआय नेते तुषार तानाजी कांबळे यांची मागणी
खोपोली / प्रतिनिधी :- छावा हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे. यात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्यासोबत विक्की कौशल मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन लक्ष्मण उटेकर यांनी केले असून दिनेश विजान यांनी मॅडॉक फिल्म्स अंतर्गत निर्मिती केली आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे, तरी या ऐतिहासिक चित्रपटाला टॅक्स फ्री (करमुक्त) करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दिग्दर्शक लक्ष्मण उटेकर यांचा छावा सिनेमा प्रेमी यांची इच्छा आहे की हा चित्रपट हा करमुक्त करण्यात यावा. जेणेकरून या सिनेमाद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास प्रत्येक घरातील नागरिकांपर्यंत पोहचेल. तसेच चित्रपटाचा दिग्दर्शक लक्ष्मण उटेकर मराठी युवक असून त्याने टॉयलेट साफ करून, वडापाव, पॉपकॉन विकणे, गाडीची साफसफाई करणे आदी कामे करून संघर्षमय जीवनामधून 'छावा' हा चित्रपट निर्माण केलेला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी युवक-युवती यांची मोठी गर्दी होत आहे. छावा चित्रपट महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर सुध्दा अत्यंत उत्तम प्रकारे चालू शकतो. लक्ष्मण उटेकर यांना आपल्या सांस्कृतिक विभागाकडून उत्तम प्रकारचा पुरस्कार देवून त्याचा गौरव करण्यात यावा. अशा प्रकारच्या दिग्दर्शकाची महाराष्ट्राला गरज आहे. लक्ष्मण उटेकर या अत्यंत गरीब घराण्यातील युवकाने आपल्या संघर्षमय जीवनातून हा चित्रपट काढलेला आहे. तरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत छावा हा चित्रपट करमुक्त (टॅक्स फ्री) करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना निवेदन देतेप्रसंगी अपर्णा म्हेत्रे व तुषार कांबळे यांचे सहकारी राहुल मंगळे आदी उपस्थित होते.
9325914120
ReplyDelete9325914120/413005
ReplyDelete