* भाजपा व नरेश पाटील युवा प्रतिष्ठान आयोजित हळदीकुंकू सोहळ्याला हजारों महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खालापूर / दिपक जगताप :- भारतीय जनता पार्टी, ढेकू व नरेशदादा युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाचे औचित्य साधून महिलांसाठी हळदीकुंकू सोहळा व खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हजारों महिला, भगिनींनी हळदीकुंकू सोहळा व खेळ पैठणीच्या कार्यक्रमात उपस्थिती दिसून आली. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण खेळ रंगला पैठणीचा सिनेअभिनेते क्रांतीनाना मालेगावकर व बाल कलाकार छोटी अभिनेत्री सह्याद्री मालेगावकर यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. नरेश दादा पाटील युवा प्रतिष्ठान आयोजित खेळ रंगला पैठणी कार्यक्रमासाठी भरघोस बक्षिसे देण्यात आली, त्याचबरोबर हळदीकुंकू संभारंभासाठी आलेल्या हजारों महिला, भगिनींना हळदीकुंकू वाण साडी भेट देण्यात आली.
या स्पर्धेतील मुख्य आकर्षक लकी ड्रॉंच्या माध्यमातून कूपन काढण्यात आले होते. यावेळी एक अत्यंत गरीब घरातील महिला सुरेखा अलीमकर या महिलेला लकी ड्रॉच्या माध्यमातून स्कुटी गाडी भेट देण्यात आली. यावेळी सर्वच महिलांनी तिचे अभिनंदन केले. खेळ रंगला पैठणी कार्यक्रमात विभूती सौरव दहिफळे साजगाव प्रथम क्रमांक (बक्षीस एलईडी टीव्ही व पैठणी), द्वितीय क्रमांक मोनाली रोहिदास पाटील (बक्षीस शेगडी), तृतीय क्रमांक प्रणिता तेजस बोर्ले (बक्षीस कुलर), चतुर्थ क्रमांक शितल पुनीत पाटील (बक्षीस मिक्सर), पाचवा क्रमांक लीना मंगेश पाटील (बक्षीस कुकर) यांस बक्षीस देण्यात आले. यावेळी खालापूर तालुक्यातील ऋतिका पाटील मिस खोपोली व भाग्य दिले तू मला कलर्स मराठी फेम शिवण्या बोराडे लिटिल रिल स्टार व हभप सचिन महाराज तांडेल शुभविवाह झी मराठी फेम यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशील पाटील, माजी आमदार सुरेश लाड, भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कर्जत-खालापूर विधानसभा निवडणुक प्रमुख किरण ठाकरे, उत्तर रायगड भाजपा सरचिटणीस दिपक बेहरे, खालापूर मंडळ अध्यक्ष सनी यादव, राजेश लाड, संदीप पाटील, प्रकाश पाटील सरपंच, विनोद खवले सरपंच, अंनता पाटील, खालापूर तालुका सरचिटणीस रविंद्र पाटील, हरिभाऊ जाधव, भाजप शहर अध्यक्ष खालापूर दिपक जगताप, रमेश रेटरेकर, हेमंत नांदे, भाजप खालापूर तालुका अध्यक्ष सुजाताताई दळवी, निकिता हेलंडे, श्वेताताई मनवे, स्नेहल सावंत, विकास रसाळ, ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र पाटील, प्रवीण मनवे, राजू पाटील, प्रशांत पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद माजी सभापती नरेश पाटील युवा प्रतिष्ठान मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.