न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय अध्यक्षपदी सना बेगम

* महाराष्ट्र प्रदेश संयोजकपदी प्रतिभा शेलार यांची वर्णी

* डॉं. अर्चना मेडेवार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नियुक्त

* महाराष्ट्र प्रदेश महिला सचिवपदी तनुजा गुळवी

* मानसी गणेश कांबळे यांच्याकडे राष्ट्रीय महासचिव पद

रायगड / अनिल पवार :- देशभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षपदी तेलंगाना डी टिव्ही स्टेट ब्युरो चिफ सना बेगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे यांनी संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान, राष्ट्रीय संघटक शेखर जांभळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉं. अकबर शेख यांच्याशी चर्चा करीत नियुक्ती केली. 

तर छत्रपती संभाजीनगर येथील डॉं. अर्चना मेडेवार यांची राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीर गोविंद माने यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तसेच सातारा येथील पत्रकार प्रतिभा शेलार यांची महाराष्ट्र प्रदेश संयोजकपदी निवड करण्यात आली आहे. न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनची महिला विंग जोमात कामाला लागली असून राष्ट्रीय महासचिव मानसी गणेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली देशभरात सभासद नोंदणी व पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन महिला राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा फिरोजा पिंजारी, राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा श्रद्धांजली रॉय, राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा श्रीमती शानू माहेश्वरी, महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव तनुजा गुळवी, झारखंड प्रदेश सचिव कनक सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय मार्गदर्शक प्रवीण कोळआपटे, राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान, राष्ट्रीय महिला महासचिव मानसी गणेश कांबळे, राष्ट्रीय महासचिव अश्वनी कुमार, राष्ट्रीय सचिव अनिल पवार, सचिव ॲंड. अरविंद कुमार, सचिव धवल माहेश्वरी, राष्ट्रीय सहसचिव लतेश शिंदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉं. अकबर शेख, राष्ट्रीय युवा सचिव फैजान सुर्वे, राष्ट्रीय कमिटी सदस्य किशोर कुमार मोहंती, राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर माने, हरियाणा प्रदेश अध्यक्ष हेमेंद्र कुमार शर्मा, कर्नाटक प्रदेश संयोजक रविश हेगडे, उत्तर प्रदेश महासचिव अनिस कुरेशी, उत्तर प्रदेश उपाध्यक्ष कमल शुक्ला, राजस्थान प्रदेश अध्यक्ष ओम प्रकाश जैन, ओडीशा प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद कुमार रॉय, मध्य प्रदेश सचिव अयाज हुसैन, महाराष्ट्र प्रदेश संयोजक अनिल कुमार पालिवाल, रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवाजी जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष नितीन पाटणकर, अकोला जिल्हाध्यक्ष मो. जुनेद मो. युसुफ, ठाणे जिल्हा संयोजक श्रीकांत म्हात्रे, नांदेड जिल्हा महासचिव जावेद अहमद, रायगड जिल्हा सचिव सागर जाधव, खालापूर तालुका अध्यक्ष सुधीर देशमुख, रोहा तालुका अध्यक्ष याकुब सय्यद, खोपोली शहर सचिव परमेश्वर कट्टीमणी, छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष रविंद्र सकपाळ, हर्ष कसेरा आदींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post