कर्जतच्या 'त्या' डॉक्टराच्या चौकशीसाठी समिती गठीत

 

* कर्जत-खालापूर तालुक्यातील सर्व डॉंक्टरांची चौकशी करण्याची सर्वसामान्य नागरिक व पत्रकारांची मागणी

कर्जत / नरेश जाधव :- कर्जत येथील एका डॉंक्टराचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होता. पदवी अथवा परवानगी नसताना कर्जत तालुक्यातील एक विख्यात, प्रसिद्ध डॉंक्टर शस्रक्रियेदरम्यान स्वत:च भुली (गुंगी) चे इंजेक्शन देत असल्याचे त्या व्हिडिओमध्ये दिसून येत होते. याबाबत अनेक रूग्ण व सामान्य नागरीक, पत्रकार यांची देखील तक्रार होती. अनेक जण चर्चा करीत होते, पण या प्रकरणातील सत्य काय ? संबंधित डॉंक्टरला भुलीचे इंजेक्शन देण्याची परवानगी आहे का ? हा व्हिडिओ कुणी व का बनविला ? या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी व सत्य बाहेर यावे, यासाठी दैनिक कोकण प्रदेश न्यूजचे मुख्य संपादक तथा न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी यांनी आरोग्य विभागाकडे जनहितासाठी दाद मागितली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली होती. 

दरम्यान, या निवेदनाची दखल घेत 1 फेब्रुवारी 2025 रोजी कर्जत उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉं. विजय मस्कर यांनी सांगितले की, संबंधित डॉंक्टराच्या चौकशीबाबत रायगड जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी जिल्हास्तरीय चौकशी समिती स्थापन केली असून या समितीत बाह्य रुग्ण निवासी वैद्यकीय अधिकारी( वर्ग-1) डॉं. किरण शिंदे, उरण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉं. बाबासो काळेल, पनवेल उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी भुलतज्ज्ञ डॉं. प्रथमेश आसवले, अलिबाग उपजिल्हा रूग्णालयाच्या परिसेविका उषा वावरे यांचा समावेश आहे. 

संबंधित जिल्हास्तरीय चौकशी समिती या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हा शल्य चिकीत्सक यांना पाठवेन, त्यानंतर पुढील निर्णय रायगड जिल्हा शल्य चिकीत्सक घेतील, असे सांगण्यात आले. दरम्यान, कर्जत व खालापूर तालुक्यातील सर्वच रूग्णालय व डॉंक्टर यांची चौकशी करण्यात यावी. रूग्णालयांना किती बेडची परवानगी आहे ? रूग्णालयात प्रशिक्षित डॉंक्टर, नर्स आहेत का ? संबंधित रूग्णालयातील डॉंक्टर यांना सलाईन, इंजेक्शन देण्याची परवानगी आहे का ? डॉंक्टरला शस्रक्रिया करण्याची परवानगी आहे का ? यासह वैद्यकीय क्षेत्रातील नियमांची अमंलबजावणी डॉंक्टर व रूग्णालये करीत आहेत का ? की नियमांची पायमल्ली करीत नागरीकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे, या सर्वांचा आढावा घेण्यात यावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व पत्रकारांकडून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post