तलवाड्यातील इरा मॉडेल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉंलेज तलवाडामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन

* स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांचे सर्जनशीलता व बक्षीस वितरणातून प्रोत्साहन मिळते - गीताभाभी पवार

गेवराई / प्रतिनिधी :- कै. ची. ओमकार प्रतिष्ठान राहेरी संचलित इरा मॉंडेल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉंलेज तलवाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा गीता भाभी बाळराजे पवार होत्या. याप्रसंगी तलवाडा पोलीस स्टेशनचे विठ्ठल चव्हाण, पांढरी येथील प्रथम नागरिक तथा विद्यमान लोकनियुक्त सरपंच सुंदर तिवारी, राजापूरचे सरपंच भास्कर गवते, संस्थेचे सचिव शिवाजीराव फलके, शाळेच्या प्राचार्या मनीषा बाबासाहेब मोरे, उपप्राचार्या मनीषा ढेरे आदी उपस्थित होते. 

सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात श्री त्वरिता देवी तलवाडा व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन गीता भाभी बाळराजे पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षीस वितरणामध्ये वार्षिक खेळ स्पर्धा तसेच वार्षिक प्रत्येक वर्गांतून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक प्रत्येक वर्गांतून आलेल्यांना मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेतील प्राचार्य यांना सायन्स ओलंपियाड फाउंडेशन मार्फत उत्कृष्ट प्राचार्य म्हणून अवार्ड देण्यात आला आहे. शाळेतील बेस्ट टीचर म्हणून मनीषा ढेरे, सोनाली यादव, वर्षा पंडित, सिया शेख, योगिता फलके, अश्विनी तांदळे यांना उत्कृष्ट टीचर संस्थेमार्फत ओमकार अवार्ड देण्यात आला आहे.

गीता भाभी बाळराजे पवार यांनी असे मत व्यक्त केले की,  इरा शाळा ही दर्जेदार शिक्षण देणारी व सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्याचे कार्य करीत आहे. पालकांचा व माता पालकांचा प्रचंड प्रतिसाद पाहून यातूनच खऱ्या अर्थाने संस्थेची गरुडझेप दिसून येत आहे. मुलांचे विविध स्पर्धेतील गुणवत्ता पाहून त्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच स्नेहसंमेलनातील विविध गाण्यातील विद्यार्थ्यांची सर्जनशीलता पाहून अभिनंदन केले. स्नेहसंमेलनाची सुरुवात बहारदार अशा विविध गाण्यातून झाली. सर्वप्रथम मराठी, हिंदी असे गाणे विद्यार्थ्यांनी सादर केले आहे. सुरुवात देवा श्री गणेशा, लल्लाटी भंडार, देवा काळजी रे, माऊली माऊली, आला बाबूराव, धिंगाणा धिंगाणा, झुमका वाली पोर चला जेजुरीला जावू,  मै निकला, आंख मारे असे विविध रिमिक्स व मराठी तडका यासारखी गाणी विद्यार्थ्यांनी सादर केली. वार्षिक स्नेहसंमेलनाला माता पालकांचा व गावातील तसेच पंचक्रोशीतील लोकांची प्रचंड गर्दी दिसून आली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. भानुदास फलके यांनी केले. त्यांनी असे म्हटले आहे की, कमी कालावधीमध्ये सीबीएससी शिक्षण देणारी व देशपातळीवरील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेमध्ये उच्चांक ठरणारी तलवाडा पंचक्रोशीतील ही एकमेव शाळा होय. छोट्याशा रोपट्याचे रूपांतर मोठ्या वट वृक्षांमध्ये ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले ते संस्थेचे सचिव शिवाजी फलके होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख सिया, मिस पंडित वर्षां मिस, फलके योगिता मिस, यादव सोनाली मिस,  तांदळे अश्विनी मिस, बापू फलके, अनंता आव्हाड, बापू पिंपळे, अंगद फलके आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post