* राज्यस्तरीय आदर्शवंत पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
कोल्हापूर / प्रतिनिधी :- जनतेचा अधिकारनामा न्यूज चॅनेलच्या वर्धापन व कै. कृष्णाबाई चुडाप्पा पाटील फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती, संस्थांचा पुरस्कार देवून दिग्गज मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. दरम्यान, यासाठी पुरस्कार प्रस्ताव 26 एप्रिल 2025 पर्यंत पाठविण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकिय, व्यावसायिक, लावण्यवती, नृत्यांगना, सौंदर्यवती, सांस्कृतिक, सिनेकलाकार, फोटोग्राफर, रिलस्टार, बालकलाकार, क्रीडा, सरपंच, राजकीय, प्रशासकीय, उद्योग, युवा, शेती, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्थांना सहभाग घेता येणार आहेत. पुरस्कार माहिती प्रस्ताव आपण पीडीएफ स्वरुपात ही पाठवू शकता. मो. 8308140050 या व्हॉट्सअँप नंबरवर आपले नाव, पत्ता, हुद्दा व कार्याची माहिती कळवावी. अधिक माहितीसाठी वंदना कोरे (8308140050) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
