नायगांव / शिवाजी पांचाळ :- नायगांव शहरातील पारंपरिक पद्धतीने विश्वकर्मा समाजातील हळदीकुंकू समारंभ कार्यक्रमात उत्साहात पार पाडला. या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक विश्वकर्मा समाजाच्या वतीने करण्यात आले होते. समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून या समारंभात सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात मंगल वंदनेने झाली, त्यानंतर उपस्थितीत मान्यवरांनी विश्वकर्मा पूजन केले. महिलांनी एकमेकांना हळदीकुंकू लावून सौभाग्यवतीचे आशिर्वाद घेतले.
याप्रसंगी मीरा पांचाळ, सुनंदा पांचाळ, सुरेखा पांचाळ, गीता पांचाळ, अरुणा पांचाळ, सुनंदा पांचाळ यांनी विश्वकर्मा समाजातील महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. आयोजकांनी उपस्थिताचे आभार मानले आणि समाजात एकता, प्रेम आणि संस्कृती जोपासणाऱ्या संदेश दिला. कार्यक्रमाच्या अखेरीस महिलांना सौभाग्यवान आणि भेट वस्तूचे वाटप करण्यात आले. संपूर्ण सोहळा भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात पार पडला.
