एका साध्या कागदाने 'त्या' डॉंक्टराची निर्दोष मुक्तता नको!

* संबंधित डॉंक्टर व भूलतज्ज्ञ यांनी तक्रारदारांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी! 

* चौकशी समिती फक्त नावाला नको...गरज पडल्यास पोलिस चौकशी करा! 

कर्जत / नरेश जाधव :- कर्जत येथील एका डॉंक्टराचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होता. पदवी अथवा परवानगी नसताना कर्जत तालुक्यातील एक विख्यात, प्रसिद्ध डॉंक्टर शस्रक्रियेदरम्यान स्वत:च भुली (गुंगी) चे इंजेक्शन देत असल्याचे 'त्या' व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, या प्रकरणी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी यांनी लेखी तक्रार केल्यानंतर एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे, परंतु डॉंक्टर संबंधित विषयाबाबत धूळफेक करीत असल्याचे दिसून येत आहे. तरी एका साध्या कागदाने 'त्या' डॉंक्टराची निर्दोष मुक्तता करण्यात येवू नये, हा अनेक लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. जर न्याय मिळाला नाही, सत्य बाहेर आले नाही तर आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनकडून देण्यात आला आहे.

आजपर्यंत कोणत्याही माध्यमात आम्ही रूग्णालय व डॉंक्टर याचे नाव प्रकाशित केलेले नाही, कारण बदनामी करण्याचा आमचा धंदा नसून सत्य बाहेर आले पाहिजे, ही आमची मागणी आहे. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कायदेशीर कार्रवाई झाली पाहिजे आणि जर चुकीच्या पध्दतीने या प्रकरणाची चौकशी झाली तर मात्र कर्जत येथील टिळक चौकात आम्ही आंदोलन करू, असा इशारा न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनकडून देण्यात आला आहे.

निवेदनाची दखल घेत कर्जत उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉं. विजय मस्कर, बाह्य रुग्ण निवासी वैद्यकीय अधिकारी (वर्ग-1) डॉं. किरण शिंदे, उरण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉं. बाबासो काळेल, पनवेल उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी भुलतज्ज्ञ डॉं. प्रथमेश आसवले, अलिबाग उपजिल्हा रूग्णालयाच्या परिसेविका उषा वावरे यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मात्र, ही चौकशी समिती फक्त चौकशीचे सोंग तर करीत नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चौकशी समितीने संबंधित डॉंक्टराकडे 'त्या' व्हिडिओबाबत चौकशी केली असता संबंधित व्हिडीओ कोरोना काळातील असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. परंतु त्यांनी पुढे सांगितले की, यावेळी मी फक्त सुई (शिरीन) आत टाकली होती, जसे व्हिडिओमध्ये दिसत आहे. परंतु इंजेक्शन भूलतज्ज्ञ सचिन यादव यांनी दिले. डॉं. यादव यांनी देखील उपस्थित असल्याचे एक पत्र चौकशी समितीला दिले आहे. 

दरम्यान, यावरून काही प्रश्न निर्माण झाले आहेत व चौकशी समितीने हे प्रश्न संबंधित डॉंक्टरला विचारावेत, असे आवाहन न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी यांनी केले आहे. 

पहिला प्रश्न असा की, संबंधित व्हिडीओ कोरोना काळातील असला तरी त्यांची तारीख व वेळ डॉक्टरने सांगावी...तसेच यावेळी कौन रूग्ण होता ? त्याचे कोणते ऑपरेशन झाले ? तो रूग्ण कोणत्या गावाचा होता? असे स्पष्ट करण्यात यावे.

दुसरा प्रश्न असा की, ऑपरेशन थियटरमध्ये निवडक लोकांना प्रवेश असतो. तर त्या दिवशी कौन कौन उपस्थित होते? संबंधित व्हिडीओ कुणी व का बनविला? त्या व्यक्तीला आत प्रवेश कसा मिळाला ?  त्याने व्हिडिओ बनविल्याचे माहित पडल्यानंतर त्याच्या विरोधात लगेच पोलिस केस का करण्यात आली नाही ? त्याची चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कार्रवाई डॉक्टर व रूग्णालयाने का केली नाही ? त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॅकमेल केले असेल, किंवा तुम्ही त्याला तोंड बंद ठेवण्याची काही किंमत दिली आहे का ? जर कोरोना काळातील व्हिडिओ होता तर तेव्हाच एफआयआर केली आहे का? 

तिसरा प्रश्न असा की, सचिन यादव अथवा कुणीही भूलतज्ज्ञ त्यावेळी तिथे उपस्थित होते आणि कुणी व्हिडिओ व्हायरल करून डॉंक्टर व रूग्णालयाची बदनामी करीत असेल तर तेव्हाच 'त्या' भूलतज्ज्ञ डॉंक्टरचा जबाब देत, त्यांच्या उपस्थितीचे पुरावे देत व्हिडिओ बनविणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल का करण्यात आला नाही ? तसेच तेव्हा कर्जत उपजिल्हा रूग्णालय अथवा अलिबाग जिल्हा रूग्णालयात संबंधित डॉंक्टर व भूलतज्ज्ञ यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे का ? की आम्ही सर्व नियम पाळून ऑपरेशन केले आहे पण आम्हाला बदनाम केले जात आहे, ब्लॅंकमेल केले जात आहे. 

चौथा प्रश्न असा की, भूलतज्ज्ञ सचिन यादव अथवा इतर कुणी पण तेव्हा उपस्थित असेल तर त्या डॉंक्टर अथवा भूलतज्ज्ञ यांच्या तेव्हाची मोबाईल लोकेशन तपासली जावी...ते कोणत्या वाहनाने कर्जतमध्ये आले होते ? कोणता टोल नाका लागला होता? बसने आले तर किती वाजेची बस पकडली...कोठून बस पकडली, किती वाजता डॉंक्टर कर्जतमध्ये आले होते ? ट्रेनने आले तर कितीची व कोणत्या स्टेशनवरून लोकल पकडली ? भूलतज्ज्ञ याच्या उपस्थितीची चौकशी करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात यावे आणि जर भूलतज्ज्ञ सचिन यादव उपस्थित नसताना त्यांनी खोटे पत्र दिले असेल तर त्यांच्यावर ही शासन, मेडीकल कौन्सिल व जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांची प्रॅक्टिस बंद करण्यात यावी. कर्जतमधील 'त्या' डॉंक्टराची देखील प्रॅंक्टिस बंद करण्यात यावी.

पाचवा प्रश्न असा की, कर्जतमधील आयुर्वैद एमडी डॉंक्टराला जर एमबीबीएस अथवा एमडी डॉंक्टराच्या उपस्थितीत ऑपरेशन करण्याचे निर्देश दिले असतील तर या ऑपरेशन प्रसंगी कोणते एमबीबीएस अथवा एमडी डॉंक्टर उपस्थित होते, त्याचे पुरावे घेण्यात यावे...ऐवढेच नव्हे तर जर कुणी एमबीबीएस अथवा एमडी डॉंक्टर उपस्थित नसेल तर त्याबाबत ही नियमानुसार कार्रवाई करण्यात यावी, अशी मागणी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

तरी संबंधित जिल्हास्तरीय चौकशी समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसेच कर्जत व खालापूर तालुक्यातील सर्वच रूग्णालय व डॉंक्टर यांची चौकशी करण्यात यावी. रूग्णालयांना किती बेडची परवानगी आहे ? रूग्णालयात प्रशिक्षित डॉंक्टर, नर्स आहेत का ? संबंधित रूग्णालयातील डॉंक्टर यांना सलाईन, इंजेक्शन देण्याची परवानगी आहे का ? डॉंक्टरला शस्रक्रिया करण्याची परवानगी आहे का ? यासह वैद्यकीय क्षेत्रातील नियमांची अमंलबजावणी डॉंक्टर व रूग्णालये करीत आहेत का ? की नियमांची पायमल्ली करीत नागरीकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे, या सर्वांचा आढावा घेण्यात यावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व पत्रकारांकडून होत आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post