* कर्जतमध्ये कॉफी मुक्त अभियानांतर्गत परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज
कर्जत / विलास श्रीखंडे :- राज्यात सर्वत्र बारावीची परीक्षा सुरू झाल्यानंतर कॉफी मुक्त अभियानांतर्गत सर्व यंत्रणा या परीक्षेसाठी सज्ज झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील अभिनव ज्ञान मंदिर प्रशाळेच्या केंद्रात बारावीच्या परीक्षेसाठी ७९४ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. कॉफी मुक्त अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची तपासणी, शाळेच्या प्रांगणात व आतमध्ये सुद्धा त्या पद्धतीचे बॅनर जनजागृतीसाठी लावण्यात आले होते, विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, परीक्षा केंद्रामधील प्रत्येक रूममध्ये पंख्याची व्यवस्था तसेच सीसीटीव्ही कॅमेरे अशी चोख व्यवस्था प्रशासनाच्या वतीने शासनाच्या आदेशानुसार करण्यात आली होती.
यंदाच्या बारावीच्या परीक्षेसाठी अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत या ठिकाणी भाऊसाहेब राऊत विद्यालय डिकसल, कन्या आश्रम शाळा भालिवाडी आणि अभिनव ज्ञान मंदिर प्रशाळा कर्जत या शाळेतील एकूण ७९४ विद्यार्थी परीक्षेसाठी दाखल झाले होते. या परीक्षा प्रक्रियेत कला शाखेतील २२२, विज्ञान शाखा १९९ वाणिज्य शाखेतून ३५१ तर, एचएससीव्हीसीमधून २२ असे एकूण ७९४ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले आहेत.
विशेषतः अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांसाठी उत्तम व्यवस्था, कॉफी मुक्त अभियानांतर्गत या शाळेचे मुख्याध्यापक डी. एस. शिंदे, केंद्र संचालिका तथा उपमुख्याध्यापिका अंकिता दाभाडे, उपकेंद्र संचालक विजय मोरे आणि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ही सर्व व्यवस्था चोखपणे पाहत असून पोलिस प्रशासनाकडून या परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर, कर्जतमधील या परीक्षा केंद्रावर यंदाच्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असून कॉफीमुक्त अभियानांतर्गत आनंदीदायी वातावरणात परीक्षा सुद्धा पार पाडताना दिसत आहे.
