खुलताबाद / प्रतिनिधी :- शहरातील नागरिकांना सतावत असलेली भीषण पाणीटंचाई नगर परिषदेचा वतीने सोडवली जात नसल्याने शहरातील निसार पठाण यांच्या नेतृत्वाखाली वर्षे 2017 व 2018 या वर्षात तीन दिवस निसार पठाण, कलीमोद्दीन खुदबोद्दीन, मसीयोद्दीन सुतारी यांनी नगर परिषदेसमोर आमरण उपोषण केले असून सुध्दा शहरातील पाणी प्रश्न नगर परिषदेचा वतीने सोडला जात नसल्याने आखेर 18 एप्रिल 2018 ला सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गांवरील शिराजी होटल या टी-पाँईटवर निसार पठाण यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले असता या रस्ता रोको आंदोलनाला गालबोट लागले होते. काही वाहनांवर दगडफेक झाली असता 15 लोकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.
2018 ते 2025 या कालावधीत न्यायालयात 15 लोकांनी लढा दिला असता 11 जानेवारी 2025 ला 15 लोकांना न्यायालयाने दोषमुक्त केले. यात निसार पठाण, जुनैद कुरैशी, नईम बेग, अबरार अहमद, मोमीन परवेज, जफर पठाण, फेरोज पठाण, इलियास पठाण, शेख रईस, सय्यद हामिद, सय्यद जाफर, इरशाद पटेल, शेख वशिम, शेख सरफराज, शेख सलमान यांच्यासाठी ॲंड. निहाल पटेल, ॲंड. मोईन, ॲंड. फैजान, ॲंड. रसुल पठाण, ॲंड. उस्मान, ॲंड. शेख अशपाक यांनी 2018 ते 2025 या काळात नि:शुल्क केस लढली.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष सलिम कुरैशी, माजी नगरसेवक अनिस जहागीरदार, मुजीबुद्दीन हाफिजोद्दिन यांनी पाण्यासाठी लढा दिला असून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या सर्वांचे व वकीलांचे शाल, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शहरातील नागरिक व विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
