बारामती / अक्षय कांबळे :- बारामतीतील श्री काशी विश्वेश्वर पूल, गोजूबावी येथील श्वान प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम, बऱ्हाणपूर येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या स्विमिंग पूल आणि शूटिंग रेंज या विकास कामांची आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली.
तसेच कामाच्या प्रगतीपथाची आणि गुणवत्तेची संबंधित अधिकाऱ्यांकडून ना. पवार यांनी माहिती घेतली आणि योग्य त्या सूचना दिल्या. या सर्व विकासकामांतून बारामतीच्या वैभवात भर पडणार आहे, असे ना. अजित पवार म्हणाले. पुणे ग्रामीण पोलिस दलासाठी प्राप्त नवीन वाहनांच्या अनवरणाचा कार्यक्रम देखील आज बारामतीमध्ये पार पडला. नगर परिषदेच्या अग्निशमन दलात बारामतीकरांच्या सेवेसाठी नव्याने सामील झालेल्या (फायर फायटर) वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
