खोपोली / दत्तात्रय शेडगे :- अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने बेलवडे हवेली (ता. कराड) सातारा येथील गरीब कुटूंबातील चार मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली आहे.
येथील शिवानी बाळासाहेब दडस (बी फार्मसी सातारा), साक्षी बाळासाहेब दडस (बीएससी सद्गुरू गाडगे महाराज काॅलेज विद्यानगर), वैष्णवी सुनिल कचरे (इंजिनिअरिंग कॉलेज कराड ENTC), साक्षी जगन्नाथ कोकरे (बीबीएस सद्गुरू गाडगे महाराज काॅलेज विद्यानगर) या चार मुलींना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदत मदत करण्यात आली आहे.
या मुलींनी पुढील शिक्षण पूर्ण करून प्रवाहात आणण्यासाठी मदत केली गेली. शिवानी दडस व साक्षी दडस यांना वडील नाहीत. तर त्यांना अजून एक बहिण असुन ती इयत्ता अकरावी सायन्समध्ये शिकत आहे. साक्षी कोकरे हिचे वडील कंपनीमध्ये होते मात्र त्यांना कामावरून काढून टाकले आहे. त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे व वैष्णवी कचरे हिचे वडील गरीब कुटुंबातील आहेत. अशा या चारही मुलीच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत करीन, असे आश्वासन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी दिले होते ते आज पूर्ण केले.
यावेळी त्यांना धनादेश देताना ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कराड तालुका अध्यक्ष सतीश थोरात, सामाजिक कार्यकर्ते तानाजी कचरे, युवराज कचरे, जगन्नाथ कोकरे, सुनील कोकरे आदी उपस्थित होते.
