मुख्याधिकारी मोकळ यांचे चौकशीचे आदेश ?

बुलडाणा / प्रतिनिधी :- स्थानिक नगर परिषद अंतर्गत  बेकायदेशीर रस्ता रुंदीकरण प्रक्रियेत धनदांडग्यांना अभय देऊन गरिब कुटुंबाच्या निवाऱ्यावर बुलडोझर  चालवून मुख्यधिकारी तथा प्रशासक मोकळ यांनी हुकूमशाही गाजविल्याने सदर पीडित कुटुंब हे न्यायासाठी प्रशासनाचे दारे ठोठावत आहेत. तर मोकळ यांच्या चौकशीसाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांच्याकडे देखील पीडित कुटुंबाने तक्रार केली आहे. 

स्थानिक नगर पालिकेने शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण हे २००६ मध्ये केले होते. कायदेशीरपणे  परिस्थिती पाहून प्रत्येक २० वर्षांनंतर रस्ता रुंदीकरण करायचे असते, सदर प्रक्रिया ही २०२६ मध्ये होणे आवश्यक आहे. खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार शशिकांत खेडेकर यांनी प्रधानमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून २०१८ मध्ये १३ कोटी ६५ लक्ष रुपयांचा रस्ता गजानन महाराज मंदिर ते जुने चेत्रबन हॉटेलपर्यंत चार किलोमीटर रस्ता दुभाजकासह डांबरीकरण करण्यात आला होता. तोच रस्ता माजी आमदार खेडेकर यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शेकडो कोटींची शहरासाठी आणल्या गेली, त्यात हाच रस्ता पुन्हा काँक्रीटीकरणाचा ९७ कोटी खर्च करून होत आहे. 

२०१८ चाच रस्ता तो फक्त करायचा, मात्र नवीन फुंकर घालून अतिक्रमण उठाव मोहीम राबविली गेली आणि  सदर पीडित कुटुंबाची खासगी मालकीची घरे ही समोर यावे म्हणून डोंगरे पीडित कुटुंब उद्ध्वस्त करून टाकले. या कारवाईदरम्यान मोकळ हे प्रामुख्याने हजर होते हे न्यायासाठी जिल्हाधिकारी बुलडाणा, पोलिस अधीक्षक बुलडाणा, पोलिस स्टेशन देऊळगाव राजा, मुख्यमंत्री सचिव, उपमुख्यमंत्री सचिव तसेच पीडित कुटुंबातील किशोर डोंगरे यांनी लाच लुचपत प्रतिबंध विभाग अमरावती (अँटी करप्शन अमरावती) यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

जिल्हाधिकारी यांनी कानपिचक्या देताच मुख्यधिकारी देऊळगाव राजा यांनी पीडित कुटुंबास सरळ खरेदीसाठी नोटीस पाठवली आहे. सदर नोटीस घेणारे न. प. कार्यालय देऊळगाव राजा मुख्यधिकारी मोकळ यांच्या समोर गेले असता तिथेही पीडित कुटुंबास पूर्ण घरे द्या अशी दमदाटी केली असे तक्रारकर्ते किशोर डोंगरे यांनी    पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post