तुळजापूर / प्रतिनिधी :- शहरातील नामांकित नगर पालिका शाळा क्र. 3 चे वार्षिक स्नेहसंमेलन शिवपार्वती मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडले. अंगणवाडी ते पाचवीपर्यंतच्या जवळपास 300 विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे उद्घाटन तुळजाभवानी मंदिरच्या तहसीलदार माया माने, मा. नगरसेविका मंजुषाताई देशमाने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा लक्ष्मीताई भोजने, कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक, पोलिस निरीक्षक शहाजी रुपनर यांच्या हस्ते करण्यात आले.
तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या. दादांच्या स्वप्नातील आदर्श शाळा ही तुळजापूर न. प. ची आहे. या शाळेसाठी लागेल ते सहकार्य करण्याचे अभिवचन दादांच्या वतीने अर्चनाताईंनी यावेळी दिले.
न. प. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला पालकांचा प्रचंड प्रतिसाद पाहून आपण भारावून गेल्याचे तहसीलदार माया माने म्हणाल्या. अशा प्रकारच्या कार्यक्रमातूनच बालकांच्या उपजत गुणांचा विकास होत असतो असे मत लक्ष्मीताई भोजने यांनी मांडले.
पहिलं नमन या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. हुंडा नको मामा... लुंगी डांस, गलती से मिस्टेक अशा गाण्यांनी प्रेक्षकांनाही नृत्य करायला भाग पाडले. युगत मांडली, माय भवानी, प्रेम रतन धन पायो.. या गाण्यांना प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. जहा पाव में पायल, राजा आले राजा आले, अनादि निर्गुण या गाण्यांना न्याय देताना बालचमुने उत्तम नृत्याचा नजराना पेश केला. मराठमोळ गाणं मोठ्या मनाचा, अंगात आलं या...या गीतांनी प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक शेंडगे, वैशाली गोमारे, पुष्पा काळे, भगवान सुरवसे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक तुकाराम मोटे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश साळुंके, गणेश नन्नवरे, रणजीत भोजने, भगवान सुरवसे, मोनिका गोसावी, कल्पना रणशिंगे यांच्यासह सतीश यादव, जालिंदर राऊत, शरद कोळगे, दिगंबर थेटे, दत्ता मेढे, अनिल राठोड, अतुल काकडे, रणजित नाईकवाडे, गोविंद प्रताप, कल्पना व्हटकर यांनी परिश्रम घेतले.
