खाटिक समाज विधवा महिलांसाठी पेन्शन योजना लागू करणार !

* अखिल गुजरात मुस्लीम खाटिक खान्देशी बकर कसाब जमातीची बैठक संपन्न 

सुरत (गुजरात) / प्रतिनिधी :- खाटीक समाजातील विधवा महिलांना स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी समाजातील विधवा महिलांना पेन्शन योजना सुरू करण्याच्या दृष्टीने खाटीक समाजाने ऐतिहासिक पाऊल उचलले असून या स्तुत्य उपक्रमाने विधवा महिलांना मोठा आधार मिळणार आहे. अखिल गुजरात मुस्लीम खाटिक खान्देशी बकर कसाब जमात गुजरात राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजक राज्य उपाध्यक्ष हाजी इम्रान हाजी पप्पू कुरेशी तसेच गुजरात राज्य कार्याध्यक्ष अब्दुल नबी कुरेशी, अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाजाचे संस्थापक इमाम बुद्ध कुरेशी, उपाध्यक्ष शकील कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

याप्रसंगी गुजरात राज्य सरचिटणीस इंझमाम उल हक कुरेशी, गुजरात राज्य कोषाध्यक्ष अब्दुल वहाब कुरेशी, गुजरात राज्य कोषाध्यक्ष अमजद लतीफ खाटिक, सहकोषाध्यक्ष सिकंदर संधू खाटिक, गुजरात राज्य सल्लागार अक्रम कुरेशी, हाजी मकसूद खाटीक, माजी खंडवा जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद इलियास कुरेशी, माजी खंडवा जिल्हा अध्यक्ष हाजी मोहम्मद इलियास कुरेशी, गुजरात राज्य अध्यक्ष (शिक्षण शाखा) अधिवक्ता कासिम कुरेशी, साजिद कुरेशी, डॉं. इमरान कुरेशी, अधिवक्ता इरफान खाटिक, जाफर मासुम खाटीक, डॉं. अजीम कुरेशी, सुरत जिल्हाध्यक्ष अख्तर हुसेन कुरेशी, अब्दुल रौफ खाटीक, जिल्हा सरचिटणीस अल्ताब मस्तान खाटीक, जिल्हा कोषाध्यक्ष मुस्ताक कुरेशी, मुनाफ गयास कुरेशी, सुरत जिल्हाध्यक्ष मुनाफ कुरेशी, जावेद फारुख कुरेशी, जुनेद गफ्फार खाटिक, राजू सलाउद्दीन खाटिक, बबलू लतीफ खाटीक, कामरेज तहसील अध्यक्ष हाजी इम्रान कुरेशी, हाजी सौद खाटीक, खलील खाटीक व्यारा, आशिक सत्तार खाटीक आदी उपस्थित होते.

या बैठकीत गुजरात राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या कामाचा तपशील बिरादरीसमोर मांडला. तसेच खाटिक समाजातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तळागाळात काम करणे, खाटिक समाजातील विधवा महिलांसाठी पेन्शन योजना लागू करणे, बारडोली तालुक्यात 22 एप्रिल 2025 रोजी खाटीक समाजाच्या इज्तेमाई विवाहा सोहळ्याची तयारी करणे, संघटना मजबूत करण्यासाठी सदस्यत्व मोहीम राबविणे आदी निर्णय घेण्यात आले. शेवटी अखिल गुजरात मुस्लिम खाटीक खान्देशी बकर कसाब जमातचे गुजरात राज्य सल्लागार अक्रम कुरेशी यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post