चैतन्य लॉन्स शिंदेवाडी येथे बीग वायएलटीपी शिबीर

* सांगता समारंभासाठी डॉं. पै. तानाजी जाधव व शिवभक्त पै. अनिकेत घुले यांची प्रमुख उपस्थिती

माळशिरस / प्रतिनिधी :- 5 ते 11 फेब्रुवारी या दरम्यान चैतन्य लॉन्स शिंदेवाडी (ता. माळशिरस) येथे सुरू असलेला आर्ट ऑंफ लिविंग आयोजित वायएलटीपी (Big YLTP) शिबिराचा सांगता कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉं. पै. तानाजी जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष युवा सेना शिवभक्त प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष शिवभक्त पै. अनिकेत घुले आदी उपस्थित होते. या वायएलटीपी (Big YLTP) शिबिरामध्ये युवक नेतृत्व प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास, योगसाधना, ध्यान, सुदर्शन क्रिया, आत्मविश्वास निर्मिती, ताणतणाव, चिंता यापासून मुक्ती, कर्माचा सिद्धांत, सेवाभाव याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षक गुरुवर्य बिपिन घाडगे, प्रशिक्षक गुरुवर्य प्रवीण भोसले, सचिन घाडगे व गितांजली दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली 125 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींनी हे वायएलटीपी (Big YLTP) शिबीर यशस्वीरित्या पूर्ण केले. 

सांगता समारंभामध्ये डॉं. पै. तानाजी जाधव, शिवभक्त पै. अनिकेत घुले यांनी युवकांना मार्गदर्शन केले. तसेच प्रशिक्षणार्थी यांनी त्यांच्यामध्ये झालेल्या परिवर्तनाबद्दल मनोगते व्यक्त केली. सात दिवस सुरू असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन पै. शिवभक्त अनिकेत घुले ग्रुप व आर्ट ऑफ लिविंग टीम, शिंदेवाडी - अमित घाडगे, राहुल तनपुरे, विरेंद्र शिंदे, निलेश खलाटे, उमेश ढोके, योगेश शिंदे, सुनिल रणवरे, विक्रम भगत, रोहित शिंदे, रोहित निकम, अभिजीत घाडगे, नितीन कदम, हनुमंत शिंदे, यशवंत ढेंबरे, आकाश मोरे, साहिल अनपट, ऋषिकेश पवार, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश रणवरे, मंगेश गोळे, विशाल साळवे, अथर्व शिंदे, बाजीराव चोपडे, संतोष धुमाळ, बाबुराव देशमुख, व्यंकट देशमुख, सचिन देशमुख, सुनिल रणदिवे, महेश घाडगे, सचिन शिंदे, प्रियंका भगत, स्वाती तनपुरे, विजया बागल, राजलक्ष्मी शिंदे, वर्षा रणवरे, कल्याणी शिंदे, पूजा पवार, दिपाली शिंदे, गिता शिंदे, मेघा शेडगे, पूजा भगत, अंजली शेडगे, शितल भगत, मयुरी कदम, संजना पवार, सोनाली लिंबोरे, स्मिता बोबडे आदी युवाचार्यांनी केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post