अ. नगर / प्रतिनिधी :- येथील शब्दगंध साहित्यिक परिषद व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने होणाऱ्या सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे, अशी माहिती शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे व सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन येत्या आठ व नऊ फेब्रुवारी रोजी कोहिनूर मंगल कार्यालयात होणार असून या संमेलनाच्या संमेलना अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक संजीवनी तडेगावकर यांची निवड यापूर्वीच करण्यात आली आहे.
कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे यांच्या अध्यक्षतेखाली चोभे टॉवर, सावेडी येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष, अहिल्यानगर महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष संपत बारस्कर यांची स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यांना सामाजिक व साहित्यिक कार्याची आवड असून त्यांनी आपला प्रभाग हिरवागार करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. अहिल्यानगर महानगर पालिकेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या वार्डामध्ये नागरिकांसाठी विविध सोयी सवलती निर्माण केलेला असून रस्ते व गटारचे सर्व प्रश्न मार्गी लावलेले आहेत. शहरातील सर्वात जास्त निधी या वार्डात खर्च करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन करून जनमानसांमध्ये आपली प्रतिमा तयार केली आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणी प्रसंगी धावून येणारे नगरसेवक म्हणून ते नावलौकिक प्राप्त आहेत. मागील वर्षी झालेल्या पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये आमदार संग्रामभैया जगताप यांच्या समवेत त्यांनी कार्य केलेले आहे. संघर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक साहित्यिक व सांस्कृतिक कार्यामध्ये ते नेहमीच अग्रेसर असतात, म्हणून त्यांची सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
यापूर्वी डॉं. सुधाताई कांकरिया, पोपटराव पवार, पद्मश्री पोपटराव पवार, ॲंड. अभय आगरकर, महापौर संदीप कोतकर, शंकरराव घुले, नंदकुमार पवार, डॉं. रावसाहेब अनुभुले, माजी आमदार राजीव राजळे, ज्ञानदेव पांडुळे, राजेंद्र उदागे, मच्छिंद्र लंके पाटील व आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्यासारखी दिग्गज मंडळी शब्दगंधच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष राहिलेले आहेत.
संपतदादा बारस्कर यांचे शब्दगंधचे कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, सुभाष सोनवणे, कार्यवाह भारत गाडेकर, उपाध्यक्ष प्राचार्य डॉं. जी. पी. ढाकणे, जयश्री झरेकर, खजिनदार भगवान राऊत, प्रा. डॉं. अनिल गर्जे, प्रा. डॉं. तुकाराम गोंदकर, नवजीवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, राजेंद्र चोभे, स्वाती ठुबे, सुरेखा घोलप, वर्षा भोईटे, बबनराव गिरी, शिरीष जाधव, राज्य संघटक डॉं. अशोक कानडे, अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी प्रा. सिताराम काकडे, संदीप गोसावी, मकरंद घोडके, श्यामा मंडलिक, हर्षली गिरी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
