* विजय उघडे यांची व्यवसायात यशस्वी वाटचाल
पेण / दत्तात्रय शेडगे :- युवा उद्योजक विजय रामा उघडे यांनी नुकतेच पेण येथे स्वप्नपूर्ती मेन्स वेअर शॉप सुरू करून उद्योग क्षेत्रात यशस्वी पाऊल टाकले आहे.
पेण येथे राहणारे विजय उघडे धनगर समाजाचे तरुण उभरते उद्योजक व नेतृत्व असून ते आता एलएलबीचे शिक्षण घेत असून त्याचबरोबर त्यांनी आता कपड्याचे दुकान टाकून उद्योग क्षेत्रात यशस्वी पाऊल टाकले आहे. स्वप्नपूर्ती मेन्स वेअर हे दुकान शिक्षक सोसायटी कौडाळ तलावासमोर पेण, रायगड येथे असून त्याचे नुकतेच जेष्ठ समाजसेवक कोंडू धोंडू उघडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
पेण तालुक्यात प्रथमच स्वप्नपूर्ती मेन्स वेअर या शाखेचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी वडील रामा भगवान उघडे, आई ताई रामा उघडे, सचिन उघडे, कोंडाजी उघडे, संजय तिवले, राहुल कोकरे, पेण तालुका धनगर समाज नेते विठ्ठलबुवा बोडेकर, लक्ष्मण मरगळा, राजू आखाडे, रवींद्र बोडेकर, रामा तिवले, हरिचंद्र उघडे, पांडुरंग ढेबे, झिमा आखाडे, माजी सरपंच जनार्धन भस्मा, ऍंड. जयेश पवार, बळीराम पाटील, मयुरेश जोशी, युवा नेते महेश भिकावले, माजी पंचायत समिती सदस्य निळकंड दिवेकर, गणेश खाकर, वामन उघडे, प्रदीप जाधव, नरेश मरगळा, विठ्ठल मरगळा, महादेव ठाकरे, जोमा ठाकरे, राकेश पिंगळा, विलास कोकले, वरुण आखाडे आदींसह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
