खोपोली / मानसी कांबळे :- सुभाषनगर येथील वासरंग मार्गांवर अयप्पा मंदिराशेजारी असलेल्या क्रिडा मैदानावर शनिवार 4 जानेवारी व रविवार 5 जानेवारी 2025 रोजी सुभाषनगर प्रिमिअर लिग 2025 चे आयोजन करण्यात आले आहे.
रितेश घोसाळकर, पंकज नाईक, गौरव चव्हाण, सुजित यादव, चंदन रायकल, राकेश चौधरी यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार आहेत. यात संघमालक संदिप गाढवे यांचा वेदांत 11, चंद्रकांत जारे यांचा सोनी कंस्ट्रक्शन 11, संदेश सावंत यांचा आरव 11, संदीप पाटील यांचा मायरा 11, सुनील माने यांचा रूद्रानी 11, योगेश गायकवाड यांचा कलश 11 अशा 6 संघाचा सहभाग आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे प्रथम बक्षिस 10 हजार व चषक, द्वितीय बक्षिस 7 हजार व चषक असून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टीरक्षक आदी पुरस्कार दिले जाणार आहेत. सुभाषनगर प्रिमिअर लिग स्पर्धेचे यंदाचे हे 5 वे वर्ष आहे.
