* आ. महेंद्र थोरवे यांची विविध ठिकाणी उपस्थिती
* शिवतीर्थ, पोसरी तलाव कर्जत येथे ध्वजावंदन
कर्जत / मानसी कांबळे :- देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि देशभक्तांना नमन करण्याचा हा दिवस. कर्जत-खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळ्यांमध्ये सहभागी होऊन राष्ट्रध्वजाला वंदन केले.
कर्जत पंचायत समिती, कर्जत नगर परिषद, प्रशासकीय भवन, कर्जत पोलिस स्टेशन पोलिस मैदान येथे त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली आणि उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांशी संवाद साधला.
याशिवाय, कर्जत-खालापूर मतदारसंघातील शिवतीर्थ, पोसरी तलाव आणि कर्जत-मुरबाड रोड या ठिकाणी ध्वजवंदन केले. याप्रसंगी बोलताना संविधानाचे महत्व अधोरेखित करीत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आणि एकजूट ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रत्येक ठिकाणी शासकीय अधिकारी, पोलिस दलातील अधिकारी, माजी सैनिक, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.