प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात

 

* जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

रायगड / प्रतिनिधी :- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 76  व्या प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के,  उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) भारत वाघमारे आदी मान्यवर व इतर अधिकारी, कर्मचारी, नागरिक, पत्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.     

सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलिस दलाच्या पथकाने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी 76 व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post