पुणे / अक्षय कांबळे :- उंड्री परिसरातील नागरीकांना मुलभूत सुविधांच्या अभावी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या भागातील विकास आराखडा रखडला असून पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते आदी अडचणी आजही जशाच्या तशा आहेत.
येथे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होत असते. यामुळे काही दिवसांपूर्वी एका डॉक्टरला आपले प्राण गमावावे लागले होते. ही अतिशय खेदजनक बाब आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि महापालिका आयुक्त यांनी याबाबत तातडीने लक्ष घालून या भागातील नागरीकांना दिलासा द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.