खालापूर / प्रतिनिधी :- मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्वत्र हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत हा सोहळा घरोघरी साजरा केला जातो. यावेळी महिलांना हळदीकुंकू आणि वाण म्हणजेच भेट वस्तू दिली जाते.
आज खालापूर शहरात हनुमान मंदिर येथे जय हनुमान महिला मंडळाकडून तर ग्रामदेवता आई साबाई माता मंदिरात साबाई नगर महिला मंडळाकडून हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी असंख्य महिलांना हळदीकुंकू निमित्ताने भेटवस्तू देण्यात आल्या. आजच्या धावपळीच्या जीवनात महिला वर्ग एकत्र येणे अशक्य असते. मात्र, या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला वर्ग एकत्र येत हळदीकुंकू समारंभ साजरा करीत असतात.