सुशिक्षित तरुणांना केटीएसपी मंडळामध्ये संधी द्यावी !

 

* विद्यार्थी सेना खोपोली शहर प्रमुख मुकेश रूपवते यांची मागणी

* खा. ता. शि. प्र. मंडळात झालेला गैरव्यवहार जनतेसमोर सादर करा!

* वाचता न येणाऱ्या अशिक्षित सदस्यांना केटीएसपीबाहेर काढा!

खोपोली / प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यात शिक्षण संस्थेत प्रसिद्ध असलेल्या खालापूर तालुका शिक्षण संस्थेमध्ये झालेल्या स्टॅम्प पेपर गैरव्यवहाराबाबत दखल घेवून लवकरात लवकर जनतेसमोर खुलासा करावा, अशी मागणी विद्यार्थी सेना खोपोली शहर प्रमुख मुकेश रूपवते यांनी मंडळातील उपाध्यक्ष अबूभाई जलगांवकर यांना निवेदन सादर करीत केली आहे.

यावेळी विद्यार्थी सेना खोपोली शहर प्रमुख मुकेश रूपवते, शिवसेना खोपोली कार्याध्यक्ष अनिल मिंडे, स्थानिक रहिवासी संजय ओव्हाळ, विद्यार्थी सेनेचे कौशल पाटील, विराज पवार, सौरव मोरे, विरेंद्र पाजी, मनोज गायकवाड, विशाल केदार आदी उपस्थित होते. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात उघड झालेल्या गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचे अध्यक्ष संतोष जंगम यांनी लवकरात लवकर पत्रकार परिषद घेवून पत्रकार, पालक व जनतेला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, याबाबत मागणी करीत इतक्या मोठ्या असलेल्या शिक्षण संस्थेत भ्रष्टाचारी सदस्यांवर लवकरात लवकर कारवाई करून बरखास्त केलेली पदे, वाचता ही न येणाऱ्या अशिक्षित सदस्यांना बाहेर काढून खोपोली व खालापूर तालुक्यातील सुशिक्षित व होतकरू लोकांची नेमणूक करावी, अशीही विनंती करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post