खोपोली / दत्तात्रय शेडगे :- डोंगरी व जंगलातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले. ते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाहुवाडी जी कोल्हापूर येथील अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे वतीने व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने म्हाळसावडे धनगरवाडा, धनगरवाडा (माण)३, मालाईवाडा धनगरवाडा येथील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी ७७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. आजही डोंगरदऱ्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. वन्य प्राण्यांची हल्ल्यामुळे विद्यार्थी शाळेपासून लांब राहत असून पायी चालत पाच ते सात किमी अंतराच्या पुढे चालत जावे लागते, त्यामुळे गोरगरीब समाजबांधव यांना शिक्षणाचा अधिकार मिळत नाही तरी शासनाने डोंगरदऱ्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना निवासी शाळा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
आजही गोरगरीब जनतेला पोटाची खळगी भरण्यासाठी करवंदे जांभूळ व इतर साधनांचा वापर करावा लागतो. लहानपणी हाँटेलमध्ये किंवा मिळेल ते काम रोजंदारीवर करुन जीवन जगावे लागते. वैद्यकीय सोयी उपलब्ध नाहीत. आजही डोंगरदऱ्या खोऱ्यातील समाज बांधव शिक्षणापासून वंचित आहे. बहुजन समाज आजही शिक्षणापासून अंधारात आहे. महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारांचा म्हणून ओळखले जाते, परंतु सोयीसुविधा उपलब्ध झाल्या नाहीत हे दुर्दैव आहे म्हणून अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, पुणे जिल्ह्यातील डोंगरदऱ्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक महत्व पटवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, राज्य कार्यकारिणी सदस्य सिध्दू सडेकर, कराड तालुका अध्यक्ष सतीश थोरात,श्रकोल्हापूर शहर अध्यक्ष सखाराम सडेकर, संजय कस्तुरे, बाबु कस्तुरे, आकाश झोरे, गिता बरागडे, संगीता झोरे, सुरेश कस्तुरे, बिरु कस्तुरे व विद्यार्थी, महिला उपस्थित होत्या.