* सागर जाधव : शिक्षण संस्थेतील भ्रष्टाचारी सदस्यांवर कारवाई करा !
खोपोली / प्रतिनिधी :- खालापूर तालुका शिक्षण संस्थेत काही सदस्य चुकीच्या पद्धतीने करीत असलेल्या कामकाजाबाबत आणखी एक प्रकार समोर आला आहे. भारतीय राष्ट्रीय मजदुर काँग्रेस तालुका अध्यक्ष सागर जाधव यांनी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळामध्ये विद्यार्थी व पालकांकडून अतिरिक्त व नियमबाह्य जी फी घेतली जाते, तसेच काही चुकीच्या पद्धतीने जे अनुदान घेतले जाते. त्याविरोधात विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी प्राप्त असून मंडळात जे सदस्य आहेत, त्यांचीच घरातील व्यक्ती संस्थेची विविध कामांचे ठेके घेत आहेत. त्यामुळे संबंधीत सदस्य आपल्याला हवे तशा रकमेची बिले काढत असून सगळाच सावळागोंधळ सुरू आहे.
केटीएसपी मंडळात नाममात्र शैक्षणिक पात्रता असलेले शिक्षकांची भरती केली जात आहे. विद्यार्थी व पालकांकडून अतिरीक्त व नियमबाह्य फी घेतली जाते. पदवीधर शैक्षणिक पात्रता असलेल्या शिक्षकांची भरती करणे तसेच जे चुकीचे कामे करणारे सदस्य आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कार्रवाई करावी ही विनंती करीत चुकीचे काम करणाऱ्या सदस्यांवर कारवाई न केल्यास केल्यास आमरण उपोषण करू, असा इशारा सागर जाधव यांनी दिला आहे.