'गंपूच्या गोष्टी' बालकथा संग्रहाला राज्यस्तरीय शब्दगंध बालसाहित्य पुरस्कार जाहीर

अ. नगर / प्रतिनिधी :- येथील भाऊसाहेब फिरोदिया ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी गौरव विजय भुकन लिखीत 'गंपूच्या गोष्टी' बालकथा संग्रहाला शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. 

लॉकडाऊन काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करीत गौरवने सहज लिहिलेल्या गोष्टी पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आल्या आणि बाल वाचकांचा प्रतिसाद चांगला मिळाला. त्यामुळे बालवयात लेखक होण्याचे गौरवचे स्वप्न पूर्ण झाले तसेच पुरस्काराच्या रूपाने पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. ९ फेब्रुवारीला अहिल्यानगर येथे सुप्रसिद्ध कवयित्री संजिवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या १६ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात गौरवला सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post