सिर्सी येथे हजरत बाबा सैय्यद मो. ताजुद्दीन औलिया (र. अ.) यांच्या उरूसनिमित्त भव्य लंगर

 


* नागरीकांनी घेतला केक आणि दालचाचा आस्वाद

* हजरत बाबा ताजुद्दीन सरकार यांच्या नावाचा जयघोष

नागपुर / अखिल रोडे :- सिर्सी गावात बसस्थानक चौकात हजरत बाबा ताजुद्दीन सरकार यांच्या वाढदिवसानिमित्त (उरूस) २७ जानेवारी २०२५ सोमवार रोजी भव्य केक वाटप आणि लंगरचे आयोजन करण्यात आले होते. नागरीकांनी केक आणि दालचाचा आनंद घेत बाबा ताजुद्दीन सरकार यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला. 

याप्रसंगी ग्रामपंचायत सिर्सीचे उपसरपंच अतुल नारनवरे, जामा मजिद कमिटीचे अध्यक्ष शकील खां पठाण, सामाजिक कार्यकर्ता आबेदीनभाई शेख, जमील तुर्रक, संजय दलाल आदी उपस्थित होते. आम लंगरचे आयोजन हजरत बाबा ताजुद्दीन सरकार मित्र परीवार सिर्सी यांच्याकडून करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी रहेमान पठाण, इब्राहीम कुरेशी, शकील तुर्रक, नशीरभाई शेख (घोडेवाले), मोहम्मद तुर्रक, गणी शेख, निजामभाई पठाण, गफ्फार छव्वारे, एजाज भाई पठाण (ख्वाजा  ट्रॅव्हल), डॅनिश शेख, गोलू पठाण, आशिक अगवान (फटाकेवाले), सलमान पठाण, रोशन छव्वारे, आहील अगवान, अरहान अगवान, अल्मिरा अगवान, समीरा तुर्रक, राजीन तुर्रक, फैजल शेख, फरहान शेख, आरीश पठाण आदींनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post