न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन रोहा तालुका अध्यक्षपदी याकूब सय्यद

 

रायगड / प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले, आपल्या नावाचा ठसा उमटविलेले तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व पत्रकार क्षेत्रात निर्भिड लेखणीने प्रसिद्ध असलेले...नागोठणे गावातील निर्भिड व ज्येष्ठ पत्रकार याकूब सत्तार सय्यद यांची नुकतीच न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन रोहा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान, राष्ट्रीय सल्लागार प्रवीण कोळआपटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण प्रदेश अध्यक्ष सुधीर माने यांनी रोहा तालुक्यातील नागोठणे येथील स्थानिक पत्रकार याकुब सय्यद यांची नियुक्ती केली. 

याकुब सय्यद यांचा सामाजिक, शैक्षणिक, क्रीडांगण क्षेत्रात गाढा अभ्यास आहे. लोकांपासून जुळलेली त्यांची नाळ व दांडगा लोकसंपर्क, शासकीय, प्रशासकीय कार्याचा चांगला अनुभव...वीस ते पंचवीस वर्ष पत्रकार क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा असलेला त्यांचा मोठा अनुभव ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करून त्यांची न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन रोहा तालुका अध्यक्षपदी निवड करीत नियुक्तीपत्र देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post